गणेश (भाऊ) चिवटेंच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका भाजपमय करणार - नुतन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :-भाजपा जि.सरचिटणीस गणेश (भाऊ) चिवटेंच्या च्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका भाजपमय करणार असे प्रतिपादन भाजपचे नुतन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी केले आहे.करमाळा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते.भारतीय जनता पार्टीच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी रामभाऊ ढाणे तर शराध्यक्षपदी जगदीश अग्रवाल यांची निवड झाली असल्याचे भाजपाचे सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी याबाबत अधिकृत पत्र प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली आहे.पै.रामभाऊ ढाणे हे याआगोदर तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत होते तर जगदीश अगरवाल हे आगोदर शराध्यक्ष म्हणून काम करत होते.या नूतन निवडीबद्दल माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,आ.प्रशांत परिचार,भाजपा जि.सरचिटणीस गणेश चिवटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या निवडीनंतर नूतन तालुकाध्यक्ष पै.रामभाऊ ढाणे व शराध्यक्ष जगदीश अगरवाल यांचा सत्कार जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते भाजपा कर्यालयात करण्यात आला.याबाबत अधिक बोलताना नूतन तालुकाध्यक्ष रामभाऊ म्हणाले की,भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारिणी सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच गाव तिथे शाखा व प्रत्येक बूथ सशक्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर करणार आहे.यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)