सन्मान व प्रगतीच्या आड येणाऱ्या अंधश्रद्धा,अनिष्ठ प्रथा महिलांनी झुगाराव्यात:प्रमोद झिंजाडे {पोथरेत उमेद गटांचा हळद कुंकू मेळावा संपन्न,विधवा महिलांनाही मिळाला सुवासिनीचा सन्मान}
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :-सन्मान व प्रगतीच्या आड येणाऱ्या अनिष्ठ प्रथा महिलांनी झुगराव्यात असे प्रतिपादन विधवा महिला सन्मान अभियानाचे प्रवर्तक प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे.मकर संक्रांत व भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोथरे (ता.करमाळा ) येथे उमेद गटांच्या महिलांचा हळद कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना प्रमोद झिंजाडे म्हणाले की,आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान केला हे विधवा महिला सन्मान चळवळीचे मोठे यश आहे.एखाद्या गोष्टीचा शक्यतो जिथं उगम होतो तिथं फारस त्या गोष्टींना महत्व दिले जात नाही पण माझ्या गावात महिलांनी माझ्या या चळवळीला ही मोठी बळकटी दिली आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यशसकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले की,सामाजिक काम करत असताना महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.या वेळी पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे म्हणाले की, महिलांनी सेंद्रिय शेतीचा महिलांनी उपयोग करून विषमुक्त अन्न आपल्या कुटुंबासाठी,समाजासाठी तयार करण्यासाठी पुढ यावे,यावेळी विरपत्नी संगीता कांबळे,विद्या शिंदे,उषा आढाव,सारिका पवार,वदंना सुरवसे,प्रियंका शिंदे, नूतन शिंदे आदींची भाषणे झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यश्री खटके होत्या.प्रास्ताविक राणी झिंजाडे यांनी केले तर सूत्रसंचलन माया शिंदे यांनी केले.यावेळी योगिता शिंदे,मंगल गोसावी,उषा झिंजाडे, शामल झिंजाडे,अविदा आढाव,उज्वला झिंजाडे,संगीता झिंजाडे,अनिता आढाव,सोनाली गोफने, मनीषा झिंजाडे,संगीता झिंजाडे,जाई पुराणे,अस्मिता शिंदे, अश्विनी शिंदे,ज्योती जाधव,आदी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.याचसोबत उमेदचे महावीर नरसाळे,हनुमंत पवार तर नितीन झिंजाडे,धनंजय शिंदे,विकी कांबळे, रामकृष्ण नायकोडे,प्रभाकर शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या