करमाळा येथे प्रभू श्रीरामाच्या मंगल जयघोषात अक्षदा व पत्रिकांचे वाटप

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- करमाळा येथे प्रभू श्रीरामाच्या मंगल जयघोषात अक्षदा व पत्रिकांचे वाटप आज शहरात करण्यात आले.यावेळी प्रथमतः भवानी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर दत्त पेठ, श्रीराम चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-अण्णाभाऊ साठे पुतळा -जय महाराष्ट्र चौक ते श्रीराम चौक अशी रॅली ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.वर उल्लेखित मार्गावरील सर्व व्यापारी,प्रतिष्ठित नागरीक,रहिवाशी यांना अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या अक्षदा व पत्रिका निमंत्रण देण्यात आले.
यावेळी या निमंत्रणाचे लोकांनी उत्साहात स्वागत केले.कार्यकर्त्यांनी जय शिवाजी-जय भवानी,जय श्रीराम यासारख्या अनेक घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला.सर्व स्वयंसेवकांच्या डोक्यावर जय श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या व ढोल ताशांचा गजर यामुळे हे अक्षदा व पत्रिका वाटप आकर्षक ठरले. यावेळी लोकांच्या चेहर्‍यावरील उत्साह सांगत होता की प्रभू श्रीराम आमच्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा आहे. इतक्या 500 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षांनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत येत आहे.लोक साखर देऊन तोंड गोड करून मंगल अक्षदा व पत्रिका घेत होते.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल