उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव {फलटणमध्ये वचनपूर्ती विराट सभा संपन्न:सभास्थळी करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांचे बॅनर,रश्मी बागल, जयवंतराव जगताप यांची विशेष उपस्थिती तर गणेश चिवटे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन...}
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
फलटण :- माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे पाणी मिळाले असेल म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्तुतीसूमने वाहून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये भाजपची विराट सभा (दि.१७ रोजी) संपन्न झाली.सभास्थळी आ.संजयमामा शिंदे यांचे बॅनर,रश्मी बागल,जयवंतराव जगताप यांची विशेष उपस्थिती तर भाजपा सोलापूर जि.सरचिटणीस गणेश चिवटे यांनी तीन हजार कार्यकर्त्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन केले.फलटण मधील यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा देवघर प्रकल्प,धोम बलकडी जोड कालवा, नाईकबोमवाडी एमआयडीसी जमीन हस्तांतर व फलटण बारामती रेल्वे लाईन प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले याप्रसंगी आयोजीत सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की,या भागाला दुष्काळी म्हणून हिनवले गेले त्या भागातील दुष्काळ आज आम्ही संपविला असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचल्या शिवाय स्वस्त बसणार नाही व यासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू देणार नाही. 23 वर्षानंतर दुष्काळी भागाला खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे पाणी मिळाले असून जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी जनतेने राहावे असे आवाहन करत त्यांनी करतानाच एक प्रकारे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवार असतील हे अप्रत्यक्षरीत्या सुचवले आहे.
यावेळी बोलताना खा. निंबाळकर म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाचे देवदूत असून मी खासदार झाल्यापासून त्यांच्याकडे पाणी,औद्योगिक वसाहत, रेल्वे ,रस्ते हे प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती आणि हे प्रश्न सोडवा अशी आग्रहाने मागणी केली होती त्यांनीही हे सर्व प्रश्न सोडवले आहेत.
या सभेने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते.यावेळी व्यासपीठावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले,आमदार जयकुमार गोरे,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार राम सातपुते ,आमदार राजेंद्र राऊत,आमदार शहाजीबापू पाटील, आमदार राम सातपुते, आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री सदाभाऊ खोत,रश्मी बागल ,माजी आमदार दिलीपराव येळगावकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,समशेरसिंह नाईक निंबाळकर,अशोकराव जाधव,अनुप शहा,सचिन अहीवळे,जिजामाला नाईक निंबाळकर,भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील देशमुख,जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,सोलापूर जि. सरचिटणीस गणेश चिवटे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या