कुकडी फेरजलनियोजनातून मांगी व रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवलरच मार्गी लागणार : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर {जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गणेश चिवटे यांच्या प्रश्नावर दिली माहिती}
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- कुकडी फेरजलनियोजनातून मांगी व रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लागणार असलेची माहिती माढा विभागाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीची आज (गरुवार,२८-१२-२३) रोजी महत्वपूर्ण मिटिंग पालकमंत्री चंद्रकांत पाटील याच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पार पडली.यावेळी खा. निंबाळकर बोलत होते.करमाळा तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.अधिक माहिती देताना निंबाळकर म्हणाले की,करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील जमिनी टेल भागात येतात यामुळे या भागातील शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.त्यामुळे करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध करून देणेसाठी संपूर्ण कुकडी प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकरात्मक आहेत.शासकीय पातळीवर अहवाल करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.तसेच मांगी मध्यम प्रकल्प कुकडी प्रकल्पात समाविष्ट करण्याची तेथील शेतकऱ्यांची अनेक दिवसाची मागणी होती ही मागणीही लवकरच कुकडी फेरजालनियोजनामुळे पूर्ण होणार आहे.मांगी तलाव विलीनीकरण व रिटेवाडी योजना झाल्यानंतर या भागातील हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.या योजना मार्गी लावल्यानंतर यापुढील निवडणुका या पाण्याच्या प्रश्नावर लढवल्या जाणार नाहीत हा खा.निंबाळकर यांनी लोकांना दिलेला शब्द खरा ठरताना दिसत आहे.
टिप्पण्या