महायुती सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: सेतू,आपले सेवा केंद्र,महा ई सेवा केंद्रात ७,१२ ८ अ व इतर अभिलेख नागरिकांना मिळणार फक्त २५ रुपयात...........शासन निर्णय जारी
करमाळा - (रियल न्यूज नेटवर्क) महसूल विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख (दाखले,उतारे) सेतू, आपले सेवा केंद्र,महा ई सेवा केंद्र याद्वारे उपलब्ध करून देणेसाठी शासनाने आज नवीन दर प्रणाली निश्चित केली आहे.याबाबत चा शासन निर्णय 👇🏻
डिजीटल ७/१२ , ८ अ, ई करार, बोजा दाखल करणे किंवा कमी करणे, गहाणखत, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, आ.पा.क.नाव कमी करणे, एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करणे,धर्मादाय संस्था विश्वास्थांचे नाव बदलणे या सर्व यासाठी २५ रुपये दोन पानासाठी वे त्यापुढील प्रत्येक एक पानासाठी २ रुपये, दर शासन निर्णयाने निश्चित करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांनी डिजीटल उतारे, दाखले काढण्यासाठी वरील शासन याप्रमाणे पैसे आकारले जावेत यासाठी शासनाने वरील शासन आदेश जारी केला आहे.शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुती सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.तसेच शासन निर्णयानुसार २५ रुपयापेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या सेतू, आपले सेवा केंद्र,महा ई सेवा केंद्र याची तक्रार तहसीलदार,उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी), जिल्हाधिकारी यांचेकडे करता येणार आहे.
टिप्पण्या