भाजपाचे सुपर वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेतृत्व :- मा.आ.प्रशांत परिचारक

भाजपाचे सुपर वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेतृत्व :- मा.आ.प्रशांत परिचारक
करमाळा :-(रियल न्यूज नेटवर्क) भाजपाचे सुपर वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेतृत्व असलेचे प्रतिपादन भाजपाचे माढा लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज व्यक्त केले आहे.भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा करमाळा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांनी करमाळा येथे आयोजित केलेल्या सुपर वॉरिअर्स बैठकीत ते बोलत होते.यावेळी दीपाप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.आधिक बोलताना श्री परिचारक म्हणाले की,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे सर्व आमदार, खासदार, जि. प. सदस्य, प. स. सदस्य याशिवाय माझ्यासह सर्व सर्व नेते आज सुपर वॉरिअर्स म्हणून काम करत आहेत.त्यामुळे आजचे हे सर्व वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेते आहेत.आताच राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश मध्ये भाजपने घवघवीत यश संपादान केले आहे यामध्ये बूथ कमीट्या व त्यामार्फत केलेलं नियोजन यांचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की,वॉरिअर्स यांनी पक्षाच्या सूचनेनुसार गावागावात सूक्ष्म नियोजन करावे.राज्य वे केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत या योजनाचा लाभ तालुक्या-तालुक्यात हजारो लोकांना होत आहे.या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करावी.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा करमाळा विधानसभा निवडणूक प्रमुख,डीपीडीसी सदस्य गणेश चिवटे म्हणाले की,करमाळा माढा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स, बूथ समित्या व इतर कमीट्या आपण सशक्त करत असून याद्वारे आपण सर्व निवडणुकीत भाजपची ताकत पक्षाच्या आदेशाप्रमाणे वाढवणार आहोत.यावेळी व्यासपीठावर भाजपा माढा लोकसभा संयोजक माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,जि. प. सदस्य शिवाजी कांबळे,माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,वाशिंबे चे उपसरपंच अमोल पवार,जिल्हा चिटणीस विनोद महानावर,ता.उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,जि. उपाध्यक्ष पै. अफसर जाधव,व्यापारी आघाडीचे जितेश कटारिया,लक्ष्मण केकाण,करंजे गावचे सरपंच काका सरडे आदी उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय घोरपडे यांनी केले तर आभार सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले.या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील सर्व सुपर वॉरिअर्स व भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल