करमाळ्यातील मांगी पाणीप्रश्नासह,विकासकामांचे प्रश्न लवकरच तडीस नेणार :खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (बिटरगाव श्री,पोथरे, करंजे येथे होणार खासदार निधीतील विकासकामे)
सांगोला :-(रिअल न्यूज नेटवर्क) मांगी पाणीप्रश्नासह करमाळ्यातील विकासकामांचे प्रश्न लवकरच तडीस नेणार असलेचा शब्द माढा लोकसभा मतदार संघांचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिला असलेची माहिती भाजपाचे नितीनभाऊ झिंजाडे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिष्टमंडळाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सांगोला येथे भेट घेतली यावेळी आम्ही त्यांचेशी संवाद साधला.
मांगी तलाव कुकडी प्रकल्पात वर्ग करण्याची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.तसेच चालू रब्बी हंगामासाठी मांगी तलावत कुकडीचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असलेचेही यावेळी त्यांनी सांगीतले.
यावेळी मौजे करंजे, बिटरगाव श्री वे पोथरे येथील अग्रक्रमाने करायच्या विकासकामांची यादी देण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हरिभाऊ झिंजाडे, विठ्ठल भाऊ शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,करमाळा शहर उपाध्यक्ष पै.रामभाऊ ढाणे,बिटरगाव श्री चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर,करंजे चे सरपंच काकासाहेब सरडे,अजिनाथ सुरवसे,किरण बागल,प्रकाश ननवरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या