न्या.शिंदे समितीचा कुणबी नोंदीचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द,मराठा आरक्षण विधानसभेत उद्या होऊ शकते जाहीर (?): मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडं राज्याचे लक्ष

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
नागपूर :- मराठा आरक्षण बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या भूमिकेकडं संपूर्ण मराठा समाजासह सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.राज्यभरात कुणबी नोंदीचा शोध घेत असलेल्या न्या.शिंदे समितीचा अहवाल उद्या (मंगळवार)विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार आहेत.आजच्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत न्या.शिंदे यांनी कुणबी नोदी शोधाचा द्वितीय अहवाल राज्य सरकारकडे आज सुपूर्द केला आहे.याबद्दल मुख्यमंत्र्यांनी न्या.शिंदे यांचे आभार मानले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ना.चंद्रकांत पाटील,ना.शंभूराजे देसाई,ना.गिरीष महाजन यासह मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.राज्यभरात आजपर्यंत मराठा समाजाच्या ५४ लाखापेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत.सन १८०० च्या पूर्वीच्या एक नोंदीला ८-१० नोंदी गृहीत धरल्या तरीही आज मितीला संपूर्ण मराठा समाज या सापडलेल्या कुणबी नोंदीमुळे ओबीसी कॅट्यागरीमध्ये समाविष्ट झाला आहे.या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शिंदे समितीचा अहवाल विधानसभेत जाहीर करणार आहेत.कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना तर कुणबी प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.सरकारला त्यांना कुणबी प्रमाणापत्र द्यावेच लागेल पण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत अशांबाबत सरकार रक्ताचे नातेवाईक ग्राह्य धरणार किंवा कोणती भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे असेल.एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण बाबत कोणती घोषणा करणार याकडे मराठा समाजासह सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल