खासदार निंबाळकरांची गाडी सुसाट,जलसिंचन प्रकल्प मंजुरीच्या मास्टर स्ट्रोक नंतर सोलापूर जिल्ह्यात (माढा मतदारसंघ) १११ ठिकाणी १० कोटींची विकासकामे मंजूर, आणखीही कामे मंजूर होणार - गणेश चिवटे. (करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर )
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा- खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर झाला असलेची माहिती भाजपाचे जि.सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची गाडी सध्या सुसाट आहे ,विविध जलसिंचन प्रकल्पाना मंजूरी देऊन व त्या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष निधी मंजुरीच्या मास्टर स्ट्रोक नंतर माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात तब्बल १११ ठिकाणी तब्बल १० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. 👇🏻याशिवाय आणखीही कामे मंजूर होणार आहेत.खा.निंबाळकरांनी राज्य सरकारला सुचवलेली 25-15 व 12-38
या योजनेअंतर्गत ही विकासकामे मंजूर झाली आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची विविध विकास कामे मंजूर झाली आहेत यामध्ये आवाटी,कंदर, केम,चिखलठाण ,जिंती,तरटगाव ,
पोमलवाडी,भालेवाडी ,वांगी-3,वांगी -4, करंजे,झरे ,बिटरगाव श्री,मोरवड,मिरगव्हाण या गावांचा समावेश आहे.मंजूर कामे पुढीलप्रमाणे आवाटी येडेश्वरी मंदिर सभामंडप १० लाख रु.,कंदर पवार घर ते विठ्ठल मंदिर मार्गे संजय थोरे घर रस्ता सुधारणा १० लाख रु.,केम हनुमान मंदिरसमोर सांभामंडप १० लाख रु, केम भैरवनाथ मंदिर सभामंडप १० लाख रु,चिखलठाण सुभाष सुराणा घर ते संजय उंबरे रस्ता काँक्रीटिकरण १० लाख रु.,चिखलठाण अर्जुन टिंगरे घर ते जि. प. शाळा रस्ता सिमेंटिकरण १०लाख रु.,जिंती जिंती ते पोमलवाडी रस्ता डांबारीकरण १० लाख रु.,जिंती गाव ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रीटिकरण १० रु.,तरडगाव सभामंडप १० लाख रु.,पोमलवाडी वाचनालय सभागृह १० लाख रु.,भालेवाडी भालेवाडी ते जुने गावठाण रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,वांगी नंबर ३ गणपतराव सातव दुकान ते गुरुलिंग पांडेकर घर रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,वांगी नंबर ४ चांद तांबोळी घर ते विष्णू ढवळे घर रस्ता १० लाख रु,रांझनी ओंकारनाथ देवस्थान पेवर ब्लॉक १० लाख,करंजे व्यायाम शाळा बांधणे ५ लाख,झरे अमृळे वस्ती ते बागल वस्ती रस्ता ५लाख,झरे चौधरी वस्ती हातपंप ते चंद्रकांत चौध रस्ता काँक्रीटिकरण१० लाख,बिटरगाव श्री जुना करमाळा रस्ता सुधारणे १० लाख,मोरवड व्यायामशाळा बांधणे १० लाख,मिरगव्हाण स्मशानभूमी सुशोभीकरण १० लाख,मिरगव्हाण जुने गावठाण ते शिरसाठ महाराज रस्ता १० लाख रु. आदी लोकोपयोगी विकास कामे मंजूर केल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेमधून खा. निंबाळकर यांचे आभार मानले जात आहे, या पुढील नजिकच्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आणखी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत.करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचेही चिवटे यांनी शेवटी सांगितले.
टिप्पण्या