शाळा बंद अफ़वा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
शाळा बंद अफ़वा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. सरकार एकही शाळा बंद केली किंवा करणार नसून सर्व मुलांना शिक्षण देण्यासाठी बांधील आहोत. राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती केली जाणार आहे. काही लोक भरती प्रक्रियेच्या विरोधात कोर्टात गेल्याने भरतीला उशीर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या