श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबंधनात
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी -:करमाळा शहरात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदाही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला, या भव्य विवाह सोहळ्यात तब्बल २५ जोडपी विवाहबंधनात अडकली असून संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला होता.
सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वधर्मीय समाजाला एकत्र आणत सामाजिक समतेचा संदेश देणारा हा सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
या भव्य विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी , बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार संयमामा शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजीभाऊ पवार, अविनाश महागावकर, चेतनसिंह केदार , रश्मीदीदी बागल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले. पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे नमूद करत गणेश चिवटे यांचे कौतुक केले,
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. त्यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना आपला कायम पाठिंबा राहील असे सांगितले.
विवाह सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी तालुक्यातील नागरिकांनी व वऱ्हाडी मंडळी आणि विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,