कृष्णा फ्लड डायवर्शनची ऐतिहासिक लढाई अखेर जिंकली.... एकदोन दिवसात मिळणार योजनेला राज्य सरकारची मंजुरी :मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह मराठवड्याला मिळणार ५५tmc पाणी )

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
सोलापूर :-कृष्णा फ्लड डायवर्शनची ऐतिहासिक लढाई अखेर आपण जिंकली असून एकदोन दिवसात या महत्वपूर्ण योजनेला राज्य सरकारची मंजुरी मिळणार असलेची माहिती माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,कृष्णा फ्लड डायवर्शन म्हणजे कृष्णा नदीचे पुराचे तब्बल ५५ tmc पाणी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह मराठवड्याला मिळणार आहे.यासाठी राज्य सरकार हजारो कोटी रुपये खर्च करून पर्जन्याछायेत येणाऱ्या दुष्काळी भागाला ही योजना नवंसंजीवनी ठरून कायमस्वरूपीचा दुष्काळी कलंक पुसला जाणार आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, मी खासदार असताना केंद्रीय जल लवदाचा सदस्य असताना या ड्रीम प्रोजेक्ट ची योजना आपण अखली होती यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळवून ही योजना आता मूर्त स्वरूपात येते आहे.याआधी प्रस्तावित असणारी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना अव्यवहार्य होती त्यामुळे ती रद्द झाली होती.यामुळे सांगली, सातारा, सोलापूर व मराठवाडा या भागाला पाणी जाणे शक्य नव्हते.या बाबीचा विचार करून कायद्याच्या चौकटित बसवून ही योजना आज प्रत्यक्षात आली आहे.या योजना मंजूर केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदाचे कपूर साहेब यांचेही आभार मानले आहेत. यावेळी भाजपा प. चे जिल्हाध्यक्ष तथा जि. प.शिक्षण सभापती चेतनसिंह केदार, भाजपा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपचे जेष्ठ नेते संजय घोरपडे, करमाळा मंडल सरचिटणीस नितीन झिंजाडे, युवा मोर्चाचे अमोल पवार आदी उपस्थितत होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)