घरकुल योजनेत गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई :-घरकुल योजनेत गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही.अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिली आहे.याबाबत निवेदन देताना ते म्हणाले की,घरकुलाच्या लाभार्थ्यांकडून पैसे घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. शासनाच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबांना घर देण्यासाठी विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. अशा वेळी लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मागणे किंवा घेणे ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब आहे.
        शासनाच्या स्पष्ट सूचनांनुसार घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे पैसे घेणे किंवा देणे मान्य नाही त्यामुळे संबंधित पैसे घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी असतील, त्यांना या प्रकरणासाठी जबाबदार धरले जाईल. शासनाच्या वतीने अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
  याबाबत लोकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)