निराधारांचे ‘मातृत्व’ जपत गणेश चिवटे यांची जनसेवा प्रेरणादायी – मा.आ.जयवंतराव जगताप

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा (प्रतिनिधी) – “निराधारांचे मातृत्व स्वीकारत ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या भावनेतून सातत्याने कार्य करणारे गणेशभाऊ चिवटे यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे मत करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले आहे.
      करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त २०१८ साली सुरू करण्यात आलेल्या निराधारांसाठीच्या अन्नदान उपक्रमाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास ह.भ.प. नाना महाराज पांडेकर, संत साहित्य अभ्यासक ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, वीट पंचायत समिती सदस्य दिलीप ढेरे, हिसरे पंचायत समिती सदस्य भरतभाऊ आवताडे, मानसिंग खंडागळे, श्रेणिक खाटेर आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना जगताप म्हणाले की,श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे हे गेल्या नऊ वर्षांपासून निराधारांना सातत्याने अन्नदान करत आहेत ते केवळ अन्नदानच नव्हे, तर निराधारांना आपलेपणाची ऊब देत त्यांचे ‘मातृत्व’ स्वीकारले आहे. “ही सेवा केवळ उपक्रम नाही; ती एक साधना आहे. ज्यांच्या मनात करुणा आणि प्रामाणिकपणा असतो, त्यांच्याच हातून असे कार्य घडते,”.गणेशभाऊ स्वतःच्या खिशातून खर्च करून सामाजिक कार्य करतात, याचा विशेष उल्लेख करत त्यांनी सांगितले की वंचित घटकांना आधार देण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. निराधारांसाठी कायमस्वरूपी निवाऱ्याची उभारणी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लवकरच ठोस पावले उचलू, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मोफत भात-भाजी वाटप, गोरगरिबांसाठी सामुदायिक विवाह सोहळे आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला असून जनतेकडून त्यांना मोठे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी जेष्ठ पत्रकार तथा ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी संत साहित्याचा संदर्भ देत सेवा, दया आणि परोपकार हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे सांगितले. ह.भ.प. नाना महाराज पांडेकर यांनी शिवजयंतीचा संदेश कृतीतून साकार करण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक भीष्माचार्य चांदणे यांनी केले. नऊ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत उपक्रमाच्या विस्ताराची माहिती त्यांनी दिली. गणेश चिवटे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेला हा छोटेखानी उपक्रम आज सर्वांच्या सहकार्याने मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. भविष्यात अन्नदानाबरोबरच निराधारांसाठी निवाऱ्याची उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भगवान गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जय श्रीराम विलास जाधव यांनी मानले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठानचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....