संजयमामांनी मंजुर केलेल्या कामातही आमदारांनां टक्केवारी पाहिजे,टक्केवारी न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणाऱ्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पहावेत:ॲड.अजित विघ्ने

करमाळा,(स्था.प्र) :- संजयमामांनी मंजुर केलेल्या कामातही आमदारांनां टक्केवारी पाहिजे,टक्केवारी न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणाऱ्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पहावेत अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस चे ता. प्रवक्ते
ॲड. अजितराव विघ्ने यांनी केली आहे.परवा राष्ट्रवादी काँग्रेसचा भरगच्च झालेला कार्यकर्त्यांचा मेळावा विरोधकांची झोप उडवणारा असुन, माजी आमदार. संजयमामा शिंदे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या बारा गणातील उमेदवार निश्चित झालेले असुन, आदिनाथ सहकारी कारखाना चालु करता आला नाही याचे शल्य असलेला पाटील गट सध्या प्रचंड तणावाखाली आहे. पक्ष बदलण्याच्या तयारीत असलेल्या पाटील गटाचे आत्मबल पुर्णपणे ढासळलेले आहे.तालुक्यातील अन्य गटांची साथ घेतल्याशिवाय एकही निवडणुक पाटील गटाने स्वतःचे ताकदीवर लढलेली नाही.त्यामुळे अन्य गटांचे लोकांना दिलेला शब्द पाळणे पाटील गटाला कठीण जात आहे.चालु वर्षात एकही विकासाभुमुख काम मंजुर करता आलेले नाही. त्याशिवाय आदिनाथ कारखाना सुरू करता आलेला नाही. हे अपयश झाकण्यासाठी पाटील गटाकडून वारंवार माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेवर टिका केली जात आहे. 
        वस्तुतः माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विकासाचा टक्का वाढविलेला असल्यामुळेच त्यांचा मतदानाचाही टक्का वाढलेला दिसुन येतो. ऊलट चालु वर्षात एकही काम मंजुर न झाल्यामुळे टक्केवारीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे आदिनाथचे धुराडे पेटलेले नाही. त्यामुळे फक्त टिका टिप्पणी आणि पत्रकार परिषद घेण्याचा धडाका प्रवक्ते सुनील तळेकर करत आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मेळाव्यातून आदिनाथ विक्रीबाबत केलेले भाष्य विरोधकांच्या जिव्हारी लागलेले असुन त्यामुळेच बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्ते विकासकामांवर न बोलता टक्केवारीवर बोलु लागले आहेत. जनसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा जनसंपर्क आणि विकासकामे आणि भविष्यातील व्हीजन स्पष्ट आहे. त्यामुळे कितीही निवडणुका हरल्या जिंकल्या तरी आता माजी आमदार संजयमामा शिंदे गट करमाळा तालुक्यातुन कधीही हटणार नाही हे त्रिवार सत्य आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे हे गल्ली बोळातले राजकारण करत नाहीत तर त्यांची सोलापुर जिल्हयात वेगळी ताकद आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय असणाऱ्या संजयमामांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून करमाळा तालुक्याच्या विकासकामांसाठी नेहमीच साथ मिळाली आहे. आमदार नसले तरी आज त्यांचेकडूनच करमाळा तालुक्याचे विकासकामांविषयी जनतेकडून अपेक्षा आहे यावरूनच संजयमामा शिंदे हेच जनतेचे खरे आमदार असल्याचे सिद्ध झाले आहे.
         विद्यमान आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नाही त्यामुळे पाटील गटाचे प्रवक्ते बालिशपणाने नवनवे फंडे वापरून विकासकामांवर बोलण्याऐवजी टिका टिप्पणी करण्यात दंग आहेत.निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत करमाळा तालुक्याच्या राजकारणात बदलाचे वारे पहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातुन तळागाळातील लोकांपर्यंत जाणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनता निवडुन देणार आहे. वारसदारांची दुकानदारी मांडणारे या निवडणुकातुन हद्दपार होतील असे सुचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....