गणेश चिवटे यांच्या पुढाकारामुळे वीट येथील शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे हे केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून शेतकरीहितासाठी काम करतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. वीट परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर त्यांनी तात्काळ आणि प्रभावी हस्तक्षेप करून तोडगा काढला आहे.
वीट येथे वीज वितरण कंपनीकडून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत दिला जाणारा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी गैरसोयीचा ठरत होता. दुग्धव्यवसाय, जनावरांची देखभाल तसेच मुलांच्या शाळेच्या वेळेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.या समस्येबाबत वीट येथील शेतकऱ्यांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार मांडली. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेताच गणेश चिवटे यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तात्काळ निवेदन सादर केले आणि सातत्याने पाठपुरावा केला.या पाठपुराव्याला यश येत आजपासून वीट परिसरातील वीजपुरवठ्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तळागाळातील शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून प्रत्यक्ष निकाल मिळवून दिल्याने गणेश चिवटे हे पुन्हा एकदा “कामाचा माणूस” असल्याचे सिद्ध झाले आहे.