वीट जिल्हा परिषद गटात भाजपाचे कमळ फुलणार – गणेश चिवटे यांच्या कार्यावर जनतेचा विश्वास : भाजपा तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील वीट जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या माध्यमातून हा गट भाजपाच्या ताब्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना सरडे म्हणाले की, गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये गणेश चिवटे यांनी वीट जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून गावोगावी रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.ते पुढे म्हणाले की, सर्व गावांमध्ये समतोल विकास करण्यावर भर देण्यात आला असून, या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष लाभ झाला आहे. त्यामुळे वीट जिल्हा परिषद गटामध्ये गणेश चिवटे यांच्या कार्याची सकारात्मक चर्चा असून, जनतेमध्ये त्यांच्या कामाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.“विकासकामांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आगामी निवडणुकीत वीट जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाचे कमळ फुललेले पाहायला मिळेल,” असा विश्वास सरडे यांनी व्यक्त केला.या वेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीसाठी भाजपाचे संघटन सज्ज झाले असून, प्रचाराला गती येत असल्याचे चित्र दिसत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....