सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत,नागरिकांनी सतर्कता बाळगावी-माजी आमदार संजयमामा शिंदे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
  करमाळा (दि.२६):-सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असुन, पावसामुळे सर्वत्र पुराचे स्वरूप येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकानी आपला जीव धोक्यात घालुन जीवघेणा प्रवास करू नये. चालु वर्षी आपल्या भागात जास्त पावसाचे प्रमाण असल्यामुळे नदी, नाले, ओढे प्रचंड प्रमाणात वहात आहेत. काही सखल भागात पाणी शिरल्याचे व रस्त्यावर देखिल पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी विनाकारण बाहेर पडु नये तसेच प्रत्येकाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन मा .आ.शिंदे यांनी केले आहे.याशिवाय अतिवृष्टीमुळे व वाऱ्यामुळे केळी बागांसहीत अन्य पिकांचे नुकसान झालेले असुन, बऱ्याच गावांमधे घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. करमाळा मतदार संघातील अनेक रस्ते खचले आहेत .याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी पत्रव्यवहार व संपर्क करीत असुन याचे लवकरच पंचनामे करणेची कार्यवाही करणेचे बाबत सुचना संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या आहेत. तरी प्रत्येक नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)