दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ....पाणी तर नाहीच पण पाणीपट्टी भरा,आ.नारायण पाटलांचे पाणी नियोजन फसले

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:- दहिगाव उपसा सिंचन पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवरती सध्या मीठ चोळण्याचा प्रकार समोर आला आहे....सदर उपसा योजनेचे पाणी तर शेतकऱ्यांना नाहीच पण पाणीपट्टी भरा म्हणून उपरती झाली आहे.दहिगाव योजनेच्या पाणी प्रश्नावरून आ.नारायण पाटलांचे पाणी नियोजन फसले असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका दहिगाव उपसा सिंचन लाभधारक पट्ट्यातून आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ.नारायण पाटील यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.
          करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या 24 गावातील शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न विद्यमान लोकप्रतिनिधी, आमदार नारायण पाटील आणि पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. 2025 च्या उन्हाळी आवर्तनाचे पाणी सदर योजना चालू होऊन महिना होत आला तरी अद्याप टेल भागामध्ये पोहोचलेले नाही परंतु शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरावी अशा नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना आलेल्या आहेत.यामुळे या भागातील शेतकरी हबकून गेलेत. एक तर उभी पिके पाण्यावाचून जळून चालली आहेत. 
         पाण्यासाठी आंदोलने करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा देऊनही पाणी अद्याप आलेलं नाही. दि.7 एप्रिल रोजी होणारे रास्ता रोकोचे आंदोलन पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेले होते परंतु संबंधित शेतकऱ्यांची याबाबत घोर फसवणूक झाली आहे.त्यामुळे नाईलाजाने उद्या दि.15 एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला असताना त्या पार्श्वभूमीवर या नोटीस आल्यामुळे पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधी संबंधित आंदोलन दडपण्यासाठी तर हे नोटिसीचे शस्त्र वापरत नसतील ना अशी शंका आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागलेली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....