गणेश चिवटे यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी : नितीन झिंजाडे
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - भाजपचे नेते गणेश चिवटे यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे त्यामुळे त्यांनी येणारी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवावी असे मत भाजपचे तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी व्यक्त केले आहे.करमाळा तालुक्यातील मौजे मिरगव्हाण येथे भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात (३१, ऑगस्ट) ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,केंद्रात व राज्या भाजपचे सरकार आहे.२०१४ पासून भाजपाने शेतकरी व सामान्य लोकांना केंद्रास्थानी ठेऊन काम केले आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला ६०००रु.पेन्शन लागू करण्याचे काम केंद्रात भाजपाने केले आहे.त्याच धरतीवर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना आणखी ६०००रु. वार्षिक पेन्शन चालू केली आहे.आज शेतकऱ्यांना पीक विमा, नैसर्गिक आपत्ती,फवारणी पंप, शेततळे,ठिबक, कांदा चाळ पासून ते ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यापर्यंतच्या सर्व शेती औजाराकरिता राज्य व केंद्र सरकार अनुदान देत आहे.काँग्रेस राष्ट्रवादी (शप) गट यावर टीका करून लोकांची दिशाभूल करतात ही मोठी शोकांतिका आहे. या योजनासाठी लागणारा पैसा टॅक्सचा जरी असला तरी २०१४ पूर्वी तो पैसा लोकांच्या खिशात न जाता काळाबाजार करून पुढऱ्यांच्या घरात जात होता.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅक्समध्ये सुसूत्रता व पारदर्शकता आणून हा पैसा योजनाच्या माध्यमातून लोकांना परत करायचे काम भाजपा सरकारने केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन करमाळा तालुक्यात भाजपचे नेते गणेश चिवटे काम करत असून त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.एकीकडे करमाळा तालुक्यातील आजवरच्या राजकीय प्रस्थापित लोकांनी ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूकदार,कामगार यांच्या नावावर कर्ज काढून हजरो कुटुंबे देशोधडीला लावली तर दुसरीकडे गणेश चिवटे हे सर्वासामान्य माणसाच्या मागे खंबीरपने उभे राहत आहेत,त्यांना सर्व प्रकारची मदत करत आहेत.त्यामुळे लोकांच्या प्रश्नाची खरी जाण आहे त्यामुळे गणेश चिवटे यांनी येणारी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवावी असे आवाहन झिंजाडे यांनी केले आहे.