पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटलांची करमाळा दौऱ्यात यशस्वी खेळी,आजी माजी आमदार यासह सर्व प्रमुख राजकीय गटांची बांधली मोट,खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सर्वांचा भरघोस पाठींबा

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे हात बळकट करण्यासाठी तसेच त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बहुसंख्य मतांनी निवडून देऊन लोकसभेत पाठवा असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे भाजपा, शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी-अजित पवार गट,आर.पी.आय-आठवले गट,रा.स.प,रयत क्रांती संघटना व मित्र पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.या मेळाव्याचे आयोजन भाजपाचे नेते,जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी केले होते.यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की,भारतीय जनता पार्टी व महायुतीने केंद्रात व राज्यात महिला, शेतकरी, विद्यार्थी,यासह समाजातील सर्व घटकसाठी अनेक लोक उपयोगी कामे केले आहेत त्या विश्वासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण आपले खासदार निंबाळकर यांना निवडून आणून दिल्लीत पाठवायचे आहेत.पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटलांची करमाळा दौऱ्यात यशस्वी खेळी झाल्याचे बोलले जात आहे.करमाळा तालुक्यातील आजी माजी आमदार यासह सर्व प्रमुख राजकीय पक्ष व गटांची त्यांनी मोट बांधली आहे.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सर्वांचा भरघोस पाठींबा मिळाला आहे.यावेळी आमदार संजयमामा शिंदे,मा.आ.प्रशांत परिचारक,मा.आ. दीपक आबा साळुंखे,शंभूराजे जगताप,रश्मी दीदी बागल,शिवसेनेचे महेश चिवटे,रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अजय बागल, आरपीआयचे अर्जुन गाडे यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली व या सर्वांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असे आश्वासन दिले.यावेळी राजकुमार पाटील, सचिन शिंदे,विलासराव घुमरे,चेतनसिंह केदार,महेश साठे,भारत अवताडे,कन्हैयालाल देवी,जयकुमार शिंदे, सुजित बागल,भगवानगिरी गोसावी,दिनेश भांडवलकर, प्रवीण जाधव,रामभाऊ ढाणे,पै अफसर जाधव,जगदीश अग्रवाल,काकासाहेब सरडे,उमेश पाटील,मोहन डांगरे,नितीनभाऊ झिंजाडे,शाम सिंधी,विनोद महानवर, अमोल पवार, बिभीषण गव्हाणे,किरण शिंदे,सोमनाथ घाडगे,नरेंद्र ठाकूर,उमेश मगर, गणेश माने,दिनेश मडके अंगद देवकते,संजय शिलवन्त,सुहास घोलप,दीपक चव्हाण,अभिषेक आव्हाड, राहुल कानगुडे,ओंकार बसवंती,बसवंतीमॅडम, संतोष वारगड, ज्योती शिंदे,पूजा माने व महायुती मधील घटक पक्षाचे गाव पातळीवरील पदाधिकारी,आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सेवा सोयायटीचे सदस्य,साखर कारखान्याचे आजी माजी संचालक,पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य यासह सर्व राजकीय गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....