लोकसभेचे बिगुल वाजले,उन्हाळा निवडणुकीत जाणार - पावसाळ्याआधी नवीन सरकार सत्तारूढ होणार,भाजपाला देशात वातावरण चांगले....

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया एकूण ५ टप्प्यात राबवली जाणार आहे. ४ जून रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निकाल येणार असून त्यानंतर नवीन सरकार सत्तारूढ होणार आहे.ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण उन्हाळाभर चालणार असून पावसाळा सुरु होताच निकाल व नवीन सरकार येणार आहे.
                देशात आता सत्तारूढ असणाऱ्या भाजपाप्रणीत नरेंद्र मोदी सरकार यांनी गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात सत्ता- योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवल्या आहेत त्यामुळे यावेळीही भाजपा सरकारला देशात चांगले वातावरण आहे. अनेक एक्झिट पोलनेही असा असा अंदाज वर्तवला आहे.
निवडणूक टप्पे खलिप्रमाणे राबवले जाणार आहेत.
◾️पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....