मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे कायदा असतो : ना.चंद्रकांत पाटील. {कोल्हापुरात डिजिटल मीडिया पत्रकारांचे दुसरे अधिवेशन संपन्न }

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
कोल्हापूर :- मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे कायदा असतो,याचा प्रत्येय मी मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत निर्णयात स्वतः घेतला आहे असे प्रतिपादन उच्च शिकणमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.कोल्हापुर येथे डिजिटल मीडिया पत्रकारांचे दुसरे अधिवेशन पार पडले यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर श्रीमंत राजे छ. शाहू महाराज,खा.धनंजय महाडिक,राज्य आयुष्यमान योजनेचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे, डिजिटल मीडिया पत्रकार संचटनेचे राज्य प्रमुख राजा माने आदी उपस्थित होते.यावेळी अधिक बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की,आजच्या काळात डिजिटल मीडियाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.बातमीचा बुड शेंडा कट करून पत्रकारांना हवी अशी बातमी प्रसारित करण्याच्या वृत्तीमुळे मध्यनंतरी मी ६-७ महिने मीडियाशी बोलणे बंद केले होते.परंतु सोलापुरात पत्रकारांच्या जास्त आग्रहखातर मराठा आरक्षण विषयावर सोलापुरात पत्रकारांना माहिती दिली की,ज्यांची नोंद सापडली आहे त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना कुणबी आरक्षण मिळेल व यामध्ये पुरावे न सापडलेल्या मराठा समाजाला क्युरिटीव्ह पिटीशन निकालांतर आरक्षण मिळेल,यावर पत्रकारांनी एक खोचक सवाल केला की,याला किती वेळ लागेल,मी म्हटलं की,मी आरक्षण विषयीच्या समितीत आहे. माझ्या गत काळातील अनुभवानुसार १ वर्ष लागेल परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागवला असून फेब्रुवारी मधील अधिवेशनात हा विषय मार्गी लागेल,असं बोललो त्यात पत्रकारांनी गोंधळ निर्माण करणारी बातमी चालवली हे खेदाच आहे.प्रिंट मीडिया प्रमाणे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिकार,कल्याणकारी योजना देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.आताचे सरकार शिक्षण, आरोग्य व इतर कल्याणकारी योजनावर प्रभावीपणे काम करत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी घरकुल योजना सुरु केल्यामुळे हजारो कुटुंबाना याचा फायदा होत आहे. देशात कुणीही उपाशी झोपू नये यासाठी केंद्र सरकार मोफत अन्नधान्य पुरवठा करत आहे.परभणी येथील विद्यार्थिनीने शैक्षणीक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किती फी लागते यासाठी किती बजेट लागते याचा अहवाल करायला सांगितले. दुसऱ्याच दिवशी अहवाल तयार केला व मुख्यमंत्री यांनी त्याला मान्यता दिली त्यामुळे आज आठ लाखाच्या उत्पन्न असणाऱ्या सर्व मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत झाले आहे,मुलांनाही अशी योजना सुरु करावी अशी मागणी आता येत आहे, त्यावरही निर्णय घ्यायला लागेल.यावेळी बोलताना खा.धनंजय महाडिक म्हणाले की,डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी राष्ट्रीय पातळीवर काम व संघटन उभ करावं त्यांना शासकीय पातळीवर हवी ती मदत आपण करू.आयुष्मान योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यावेळी म्हणाले म्हणाले की,राज्य व केंद्र सरकारची आरोग्य योजना एकत्र करून आयुष्यमान योजना केंद्र सरकारने तयार केली आहे यामुळे देशातील ८०-८५% लोकांना ५ लाखापर्यंत खर्चाचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत.या अधिवेशनात प्रास्ताविक डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे प्रमुख राजा माने केले.या अधिवेशनासाठी करमाळा येथून संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके,डॉ.नरेंद्र ठाकूर, अंगद भांडवलकर,नितीन झिंजाडे, राहुल रामदासी,सूर्यकांत होनप आदी उपस्थित होते याशिवाय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्यभरातून हजारो पदाधिकारी प्रतिनिधी आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल