अखेर मराठे जिंकले,महाराष्ट्रात आनंदाची लाट:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या महायुती शासनाकडून मान्य {करमाळ्याचे मंगेश चिवटे यांची महत्वपूर्ण भूमिका}

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,मंत्री मंगलप्रभात लोढा,मंत्री दीपक केसरकर यांनी आज नवी मुंबईच्या वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेट घेतली व मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करत असलेबाबत राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली.मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे पाटील यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले.गत ४० वर्षापूर्वी स्व.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा महायुती सरकारने अवघ्या दीड वर्षात सोडवला आहे यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजात आनंदाची लाट आली आहे.
या अध्यादेशानुसार आता कुणबी नोंद सापडलेल्यांच्या नातेवाईकांना कुणबी आरक्षण लागू होणार आहे.सोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली.मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.दरम्यान सदरचा अध्यादेश देताना मराठा समाजाच्या या लढ्यात सुरवातीपासून सरकारकडून मध्यस्थी करणारे मुख्यमंत्री यांचे विशेष सहाय्यक,करमाळ्याचे मंगेश चिवटे हेही उपस्थित होते.त्यांनी या संपूर्ण आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन आनंदोत्सव साजरा केला यावेळी त्यांना आनंदाश्रु अनावर झाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)