मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात - २०जानेवारीपासून मराठ्यांच मुंबईत आंदोलन तर २४ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण क्युरेटीव्ह पिटीशनवर सुनावणी...
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
बीड :- सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाने दिलेला अल्टीमेटम संपत आलेला असतानाच आज बीड मध्ये सकल मराठा समजच्या इशारा सभेत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी आणखी १९ जानेवारी २०२४ पर्यंतचा वेळ दिला आहे.सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी सदरचा वेळ दिल्याने सरकारला आणखी संधी मिळाली आहे.सरकारने २० जानेवारी पर्यंत आरक्षण जाहीर करावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.राज्यात ५४ लाखाहून अधिक मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.या नोंदीमुळे राज्यातील बहुसंख्य समाज कुणबी मधून ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत आला आहे.मराठा समाज मागास असलेचा गायकवाड आयोगाचा अहवाल व राज्यात सध्या सापडलेल्या लाखो मराठा समाजाच्या कुणबी (मागास जातवर्ग) नोंदी याच मराठा समाज मागास प्रवर्ग असलेचा सबळ पुरावा म्हणून समोर आला आहे.राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल ही लवकरच सादर होणार आहे.यावरून सुप्रीम कोर्टात मराठा समाज मागास असलेचे सिद्ध होऊन आरक्षणाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा होणार आहे.या सर्व पार्श्वभूमीवर २४ जानेवारी २०२४ रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या क्युरिटीव्ह पिटीशन सुनावणीचा निकाल महत्वपूर्ण ठरणार आहे.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की,मराठा समाजाला पुढील आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.एकंदरीत मराठा आरक्षण लढाई आता अंतिम टप्प्यात आली असल्याच चित्र निर्माण झाल आहे.