मराठा व धनगर आरक्षण प्रश्न लवकरच निकाली निघणार, पंतप्रधान मोदींचे अभिवचन, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व खा.छत्रपती उदयन महाराज यांची यशस्वी शिष्टाई....खा.निंबाळकर यांची कार्यतात्परता
दिल्ली :-मराठा व धनगर आरक्षण प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे अभिवचन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे,खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व खा.छत्रपती उदयन महाराज यांची यशस्वी शिष्टाई होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.कालच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.त्याच पार्श्वभूमीवर मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व खासदार छत्रपती उदयनराजे महाराज यांनी मागितली होती.आज भेटी दरम्यान,पंतप्रधान महोदयांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थिती वर चर्चा केली.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा व धनगर या दोन्ही आरक्षणाच्या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आहे.
दोनच दिवसापूर्वी खासदार निंबाळकर यांनी मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडला होता.त्या पार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांनी पंतप्रधान यांची भेट घेतल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यतात्परतेचा अनुभव आला आहे.स्वतः पंतप्रधान महोदयानी यामध्ये लक्ष घालण्याचे अभिवचन दिल्याने मराठा व धनगर आरक्षण प्रश्न खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व खा.छत्रपती उदयन महाराज यांच्या मार्फत सुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.