मांगी तलावासंदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक -१५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणाबतचा अंतिम अहवाल येणार : गणेश चिवटे (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केली शिफारस)

🚩रियल न्यूज नेटवर्क🔥(नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीनिकरण बाबत अंतिम अहवाल येणार असलेची अधिकृत माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,मांगी तलावसंदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची याबाबत काल दिल्लीस्थित वेबकॉस कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात कायमस्वरूपी विलीन करण्याची मागणी या भागातील नागरिक गेली ५० वर्ष करीत होते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कुकडी विभागाला विलीनकरण बाबत शिफारस केली आहे.
गेली ५० वर्षे या मागणीला यश येत नव्हते परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विलिनी करणासंदर्भात गत जून- २०२३ मध्ये मागणी केली होती.खासदारांनी यामध्ये जातीने लक्ष घालून संपूर्ण कुकडी प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्याचे नियोजन केले.यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेतला आहे.
केंद्र सरकारच्या वेबकॉस या संस्थेमार्फत अवघ्या ६ महिन्यात फेरजलनियोजन अहवाल बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून आता अंतिम टप्प्यात आहे.याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल वेबकॉस संस्थेचे CEO शंभु आझाद यांच्यासोबत दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.या संस्थेचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत तयार होऊन मांगी तलाव कुकडी प्रकल्पात अधिकृतरित्या कायमस्वरूपी विलीन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन झाल्यानंतर या तलावावर अवलंबून असलेल्या २५-३०गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.करमाळा,जामखेड,कर्जत,परांडा या भागातील बाजार समिती व सर्व साखर कारखाने,दुग्ध व्यवसाय यासह सर्वच छोट्या- मोठ्या व्यावसायांना सोन्याचे दिवस येणार आहेत.करमाळा शहर व परिसरातील लोकांमध्ये मोठी भरभराट होणार आहे असे चिवटे यांनी शेवटी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल