मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याची खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेत केली आग्रही मागणी..... (खा.निंबाळकर यांचे दिल्लीतील वजन व त्यांच्या कामाचा झपाटा पहाता मराठा व धनगर आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारकडून लवकर तोडगा निघणार ?)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥 -नितीनभाऊ झिंजाडे )
करमाळा :-मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अभ्यास समिती नेमून या दोन्ही समाजाला आरक्षण देण्याची मागणी माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.लोकसभेच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवला आहे.याबाबत लोकसभेत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,२५ वर्षांपूर्वी एका सर्वसाधारण मराठा कुटुंबाकडे सरासरी २५ एकर शेती होती.आता हे क्षेत्र प्रतिकुटुंब २-३एकरावर आले आहे.या परिस्थितीत सर्वासामान्यांना कुटुंब चालवीतना खूपच अडचणी येत आहेत.यामुळे अशा कुटुंबातील सदस्यांना उच्च शिक्षण घेताना अडचणी येत येत आहेत.सध्या तरुणांना नोकरी हवी असेल तर उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे.यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता लागते.शेतीतून पुरेसे उत्पन्न नसल्याने लाखो तरुणांना शिक्षणापासून वंचीत रहावे लागत आहे.महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३%आहे व याच खालोखाल धनगर समाजाची लोकसंख्या आहे तसेच धनगर व धनगर समाजाला महाराष्ट्रातबाहेर आरक्षण आहे.
धनगड व धनगर समाज एकच असल्याने धनगर समाजाला महाराष्ट्रात आरक्षण मिळाले पाहिजे.मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात यावी व समिती नेमण्यात यावी अशी मागणी खा. निंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.खा.निंबाळकर यांचे दिल्लीतील वजन व त्यांच्या कामाचा झपाटा पहाता मराठा व धनगर आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारकडून लवकरच तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे.याबाबत केंद्र सरकार आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....