२५% अग्रीमसोबत उडीद,मूग,तूर,कांदा, कपाशी यासह सर्व खरीप पिकांची पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या : नितीन झिंजाडे

२५% अग्रीमसोबत उडीद,मूग,तूर,कांदा, कपाशी यासह सर्व खरीप पिकांची पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या : नितीन झिंजाडे
करमाळा : २५% अग्रीमसोबत उडीद,मूग,तूर,कांदा, कपाशी यासह सर्व खरीप पिकांची पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी भाजपचे नितीन झिंजाडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


याबाबत सरकारला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी च्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना अवघ्या १ रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यामुळे गत २०२३,खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवून प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांकडील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम झाला आहे.शासनाने २५% विमा अग्रीम मध्ये मोजक्याच पिकांचा समावेश केला आहे. या ग्राह्य धरलेल्या नुकसानपात्र पिकासोबत उडीद,मूग,तूर,कांदा, कपाशी यासह सर्वच पिके आवर्षनाणे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. त्यामुळे २५% अग्रीम सोबतच इतर सर्व पिकांची नुकसान भरपाई ग्राह्य धरण्याचा आदेश सबंधित विमा कंपन्याना पाठवण्यात यावा व राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी झिंजाडे यांनी केली करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पाठवण्यात आल्या आहेत व या मागणीची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून पुढील कार्यवाहीला सुरवात केली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)