करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; २.५२ लाखांचा गांजा व ८ लाखांची पजेरो स्पोर्ट कार जप्तएकूण १०.५२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; एका आरोपीला अटक

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा | प्रतिनिधी | दि. ३० जुलै २०२६
करमाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत २ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा १० किलो १०० ग्रॅम गांजा आणि ८ लाख रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट कार असा एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री पांगरे (ता. करमाळा) येथील टेंभुर्णी-जेजुरी मार्गावरील पांगरे स्मशानभूमीजवळ एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी सापळा रचून थांबले.दरम्यान, संशयित रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गाराकोळे, ता. माढा, जि. सोलापूर) हा सिल्व्हर रंगाच्या पजेरो स्पोर्ट कारमधून आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेला १० किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला.
         या कारवाईत पोलिसांनी २,५२,५०० रुपये किमतीचा गांजा व ८,००,००० रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कार असा एकूण १०,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
         याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६४४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच करमाळा पोली०स ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)