मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प; करमाळ्यात विक्रमी रक्तदानाचा निर्धार : गणेशभाऊ चिवटे
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा (स्था.प्र.) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प उपक्रमांतर्गत भाजपा शहर मंडल, करमाळा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात विक्रमी रक्तसंकलन करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती श्री. गणेशभाऊ चिवटे यांनी दिली.
हे रक्तदान शिबिर बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत भाजपा संपर्क कार्यालय, गायकवाड चौक, करमाळा येथे होणार आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच युवकांनी सेवाभावातून रक्तदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.युवक, महिला, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. गणेशभाऊ चिवटे, जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर (प.) तथा जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर जिल्हा परिषद यांनी केले आहे."रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या भावनेतून अधिकाधिक रक्तदात्यांनी या सेवा संकल्पात सहभागी होऊन मानवतेच्या या महान कार्यात आपले मोलाचे योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.