करमाळ्यात नुसते श्रेयवादाचे पेव, रस्ते विकासासाठी सरकारकडून मिळालेला निधी ही पुरहानीची उपाययोजना :-सरपंच रवींद्र वळेकर

करमाळा :-(स्था.प्र.):-करमाळ्यात नुसते श्रेयवादाचे पेव फुटले असून रस्ते विकासासाठी सरकारकडून मिळालेला निधी ही पुराहानीची उपाययोजना असलेच मत निंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळेकर यांनी व्यक्त केले आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी नुकताच ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यावरून करमाळा तालुक्याचे आमदार नारायण आबा पाटील तसेच भाजपा नेते दिग्विजय बागल व रश्मीताई बागल यांच्याकडून या कामाचे श्रेय घेण्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सरपंच रवींद्र वळेकर म्हणाले की, २०२५ मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्या संदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाने संकलित केलेली होती त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना प्राधान्याने निधी देण्याचे धोरण ठरवले गेलेले होते.
       त्यानुसारच करमाळा तालुक्याला दोन टप्प्यांमध्ये दोन मंजूर आदेशाने २०२५ मध्येच हा निधी मंजूर झालेला होता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जि.प-२०२५-प्र.क्र.३५ (३)/बांध-३, बांधकाम भवन, मर्झबान रोड फोर्ट, मुंबई-४००००१ दि.३१/०३/२०२६ रु.४५० लक्ष या आदेशानुसार ९ रस्त्यांसाठी ४ कोटी ५० लाख व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जि.प-२०२५-प्र.क्र.३५ (४)/बांध-३, बांधकाम भवन, मझ् बान रोड फोर्ट, मुंबई-४००००१ दि.३१/०३/२०२६ रु.४०० लक्ष या आदेशानुसार ८ रस्त्यांसाठी ४ कोटी निधी असा एकूण १७ रस्ते विकास कामांसाठी ८ कोटी ५० लाख निधी मंजूर झालेला आहे.हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामविकास विभागाच्या मदतीने केलेले आहेत त्यामध्ये स्थानिक मागणीचा विषयच येत नाही.श्रेयवादच्या या किळसवाण्या प्रकाराला लोक कंटाळले आहेत.श्रेयवादाचा हा वाद निरर्थकआहे असलेच परखड मत त्यांनी मांडले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)