पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक मुसंडी; करमाळ्यात जल्लोष

संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥करमाळा :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार कामगिरी करत तब्बल २०० जागांचा टप्पा गाठला आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला १०० जागांच्या आत रोखण्यात भाजपला यश आले आहे. काँग्रेससह इतर पक्षांचा या निवडणुकीत अक्षरशः धुव्वा उडाला आहे.या भव्य यशाचा आनंद साजरा करण्यासाठी करमाळा येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, “जय श्रीराम”, “वंदे मातरम”, “भारत माता की जय” अशा घोषणा देत जल्लोष केला.यावेळी बोलताना भाजप सोलापूर (प.) चे सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या जुलमी कारभाराला स्पष्ट नकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. ही विजयाची लाट देशातील परिवर्तनाची दिशा दाखवणारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, भाजपा नगरसेवक रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे ,भाजपा सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे , गणेश महाडिक , अमोल पवार, दत्तात्रय बेडकुते, स्वानंद वांगडे , कपिल मंडलिक , राहुल रामदासी , जयंत काळे, भरत गुंड, प्रसाद गेंड, शरद कोकीळ, संजय किरवे, गणेश गोसावी , विनोद इंदलकर , शैलेश राजमाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)