यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १२ विच्या निकालात टॉपर ९ विद्यार्थ्यांपैकी ६ मुलींची बाजी, यशस्वी विद्यार्थ्याचा महाविद्यालयाकडून सन्मान
करमाळा :- २०२५-२६ शैक्षणिक वर्षाचा १२ निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये १२ विच्या निकालात टॉपर ९ विद्यार्थ्यांपैकी पैकी ६ मुलींनी उत्कृष्ट गुण मिळवत निकालात बाजी मारली आहे.यशवंतराव चव्हाण महाविदयालय हे NAAC द्वारे "B" ग्रेड (3" सायकल) मान्यताप्राप्त महाविद्यालय आहे.या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी कला शाखेत परीक्षेस बसलेले 312 पैकी 280 उत्तीर्ण झाले आहेत,वाणिज्य शाखेत परीक्षेस बसलेले 203 पैकी 197 उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेत परीक्षेस बसलेले 232 पैकी 230 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा. श्री. विलासरावजी घुमरे (सर), अध्यक्ष श्री. मिलींद फंड (सर), महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.पी. माने सर वरिष्ठ विभाग उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभाग प्रशासन अधिकारी श्री. संभाजी किर्दाक, सहसचिव श्री. विक्रमसिंह सुर्यवंशी व यशवंत परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
१२ वी बोर्ड परीक्षा निकाल सन २०२५-२६ खालीलप्रमाणे
१)कु. गुरव वैष्णवी राजेंद्र-८४.६७%
२)कु. क्षिरसागर वैष्णवी दत्तात्रय-८०.६७%
🔹वाणिज्य शाखा-(निकाल९७.०४%)
१)कु. वासाणी यशस्वी राजेंद्र-९१.१७%
२)श्री. खिलोशिया प्रतिक संदीप-८४.६७%
🔹विज्ञान शाखा-(निकाल९९.५५%)
१)कु. कुदळे शिवांजली दिंगबर-७५.६७%
२)श्री. बोरगावकर ओंकार सतीश-७२.३३%
३)कु. झिंजाडे ऋतुजा नितीन-७२.१७%