पोथरे हद्दीतील शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा रस्तारोको आंदोलन करणार,पोथरे ग्रामस्थांकडून वीज मंडळास निवेदन
करमाळा :- पोथरे हद्दीतील शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी पोथरे ग्रामस्थांकडून वीज मंडळास आज निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात पुढे म्हटले आहे की,पोथरे हद्दीत ६० पेक्षा अधिक डीपी आहेत. यामधील २० च्या आसपास डीपी दररोज वीज मंडळाकडून बंद केले जातात.शेतीसाठी दररोज ८-१० तास वीज पुरवणे ही वीज मंडळाची जबाबदारी आहे.दररोज डीपी सोडवण्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गलथाण कारभाराचा नाहक त्रास होतं आहे.मांगी सबटेशन पासून पोथरे पर्यंत दुसरी मेन लाईन टाकणार आहोत याचे नियोजन चालू आहे हे गेली वर्षभर वीज मंडळाकडून सांगून शेतकऱ्यांची बोळवन करण्यात येते आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना, जाणवरांना पाण्याची मोठी गैरसोय होतं आहे.पोथरे गावासाठी दुसरी स्वतंत्र मेन लाईन टाकून पोथरे गावातील शेतीपंपाचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा.येत्या ७ दिवसात वीज पुरवठा सुरुळीत न झाल्यास पोथरे येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल यची नोंद घ्यावी व तत्पूर्वी शेती पम्पचा वीजपुरवठा सुरुळीत करावा अशा प्रकारची विनंती या निवेदनद्वारे करण्यात आली आहेत.या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे करमाळा सरचिटणीस,पत्रकार नितीन झिंजाडे, शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चन्द्र झिंजाडे, पत्रकार हरिभाऊ हिरडे,ग्रामपंचायत सदस्य रघुवीर जाधव ळ,प्रा.अजिनाथ झिंजाडे,पै.तात्यासाहेब शिंदे,राज झिंजाडे,सुदाम झिंजाडे, दयानंद रोही,राहुल पाटील,मारुती लाढाणे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
🔹चौकट :-
पोथरे येथील वीज पुरवठा विस्कळीत असून लोडमुळे डीपी सोडवावे लागतात. पोथरेसाठी नवीन मेन लाईन टाकण्याचे प्रस्तावित असून ते काम झाल्यानंतर वीजपुरवठा सुरुळीत होईल
@श्री.सूर्यवंशी,कनिष्ठ अभियंता करमाळा