पोथरे-निलज ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
पोथरे: पोथरे (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अंगणवाडी सेविका योगिता संदीप शिंदे हिस सोलापूर येथे आदर्श अंगणवाडी पुरस्कार भेटल्याबद्दल ग्रामपंचायतद्वारे सत्कार करण्यात आला याच वेळी सर्व ग्रामसखी सौ. राणी झिंजाडे, सौ संगीता पाटील ,सौ माया शिंदे,सौ नूतन शिंदे,सौ प्रियांका शिंदे,सौ उषा आढाव,सौ अश्विनी गायकवाड यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच गावपातळी वरील कार्याबद्दल ग्रामपंचायतद्वारे सत्कार करण्यात आला त्यांचसोबत गावातील दोन्ही ग्रामसंघ संस्कृती ग्रामसंघ आणी प्रगती ग्रामसंघ यांच्या अध्यक्ष,सचिव आणी कोषाधक्ष यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमात आर्थिक समावेशन, महिला सक्षमीकरण, IFC अंतर्गत रोपवाटिका उपक्रम, PMFME, CFME, बँक लिंकेज, डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्हे प्रतिबंध या विषयांवर मा. तालुका व्यवस्थापक कक्ष, करमाळा (BMM) कु. सुषमा बिचकुले मॅडम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच उमेद अभियानांतर्गत गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसखी व सिनियर ग्रामसखी यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट उद्योजिका उषा आढाव आणि उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्या नूतन शिंदे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. BMM सुषमा बिचकुले मॅडम होत्या. व्यासपीठावर महसूल अधिकारी हर्षल सर, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामसंघ अधिकारी तसेच समूहातील सर्व सदस्य, सिनियर ग्रामसखी आणि ग्रामसखी उपस्थित होते.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)