जागतिक महिला दिनानिमित्त वाशिंबे येथे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :वाशिंबे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाशिंबे येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते होणार असून तहसीलदार शिल्पा ठोकडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध क्रांती नाना माळेगावकर यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये फ्रीज, पैठणी, पिठाची चक्की, कुलर यांसह ५१ उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
पंचक्रोशीतील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.