करमाळा येथे १० मे २०२६ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा — गणेश चिवटे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा : श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि. १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता गोरज मुहूर्तावर करमाळा येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश (भाऊ) चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे.यावेळी श्री.चिवटे म्हणाले की, प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यक्रमाची तारीख बदलून १० मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. यावर्षीचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.गेल्या चार वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षांत सुमारे शंभर वधू-वरांचे विवाह यशस्वीरीत्या लावण्यात आले असून, यंदा अधिकाधिक जोडप्यांचे विवाह पार पाडण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
💥विविध सुविधा उपलब्ध
या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांना आयोजकांकडून विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये भांडीसेट (हंडा, तांब्या, वाट्या, ग्लास, स्टील डबे आदी), वधू-वरांसाठी लग्नाचे कपडे, नवरदेवासाठी सूट व चप्पल, मानपानासाठी टॉवेल व टोपी, वधूसाठी शाल व चुन्नरी, मंगळसूत्र, जोडवी, बिचवे, हार-फुले-गजरे, मेकअप किट आदींचा समावेश आहे.तसेच आकर्षक मंडप सजावट, वाजंत्रीसह मिरवणूक, नववधू-वरांची आगळीवेगळी शोभायात्रा, येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भोजन व्यवस्था व फिल्टर पाण्याची सोय करण्यात येणार आहे. विवाहस्थळी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोयही केली जाणार आहे. सर्व वधू-वरांना आयोजकांकडून मानाची शिदोरी देण्यात येणार आहे.
💥नोंदणीचे आवाहन
या विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी सुरू असून तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वधू-वरांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत, असे आवाहन गणेश चिवटे यांनी केले.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सन्मानाने व पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वांच्या स्मरणात राहील असा भव्य व दिमाखदार सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पदाधिकारी नियोजनपूर्वक कामाला लागले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
💥विवाह नाव नोंदणीसाठी संपर्क
🔹भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक, करमाळा 
🔹श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या, करमाळा 🔹जी.एन.सी मिल्क सेंटर, करमाळा, कोर्टी, वरकुटे, घारगाव
💥संपर्क
🔹डेअरी फ्रेश मिल्क & मिल्क प्रोडक्ट, करमाळा
         🔹संजय किरवे मो.- 7218757685
         🔹प्रमोद फंड मो.- 94210639
         🔹 संतोष जवकर मो.- 9422627966

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)