७५१९ मतांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष;दिवेगव्हाणमध्ये गणेश चिवटे यांची भव्य हत्तीवरून मिरवणूक..!

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा(स्था.प्रतिनिधी):-करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वीट जिल्हा परिषद गटातून नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य सौ.अश्विनी गणेश चिवटे यांचा ७५१९ मतांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष तालुक्यातील दिवेगव्हाणमध्ये होणार आहे.सोमवार दि. २३/०२/२६ रोजी  सांय ठीक ५ वाजता भाजपा सरचिटणीस गणेश चिवटे यांची हत्तीवरून भव्य मिरवणूक,भव्य नागरिक सत्कार व विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवगर्जना दूध डेअरीचे चेअरमन ईश्वर काका मोरे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी ताई चिवटे या सोलापूर जिल्ह्यात ७५१९ मतांनी विजयी झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विजयाच्या आनंदात गणेश चिवटे यांची हत्तीवरून मिरवणूककाढण्यात येणार आहे.यापूर्वी माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेला निवडून आल्यानंतर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र ती मिरवणूक होऊ शकली नव्हती. आता अश्विनी ताई चिवटे यांच्या विजयानंतर गणेश चिवटे यांच्या सन्मानार्थ हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात सजवलेला हत्ती, बँड पथक व हलगी वादनाचे विशेष आकर्षण असणार आहे.
पंचक्रोशीतील नागरिक, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन चेअरमन ईश्वर काका मोरे यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)