बालाजी अमाईन्स लि. सोलापूर तर्फे पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा(दि.२५) :- सोलापूर येथील बालाजी अमाईन्स लिमिटेड तर्फे पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद पोथरे शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बालाजी अमाईन्स लिमिटेडचे CSR विभागप्रमुख श्री . अनिल विपत साहेब व CSR असिस्टंट मॅनेजर श्री . दत्तप्रसाद सांजेकर साहेब यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले.पावसाळ्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे कान्होळा नदीला आलेल्या पुरामुळे पोथरे आणि परिसरात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे शेतकरी आणि शाळेतील विद्यार्थी यांचे जे अतोनात हाल व नुकसान झाले त्याचा विचार करून बालाजी अमाईन्स लिमिटेड सोलापूर यांनी माणुसकीच्या नात्यातून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून आज जिल्हा परिषद पोथरे शाळेतील 54 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले .
यावेळी बोलताना CSR विभागप्रमुख श्री . विपत साहेब यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करून आपली शैक्षणिक प्रगती अधिकाधिक यशस्वी करावी असे आवाहन केले . आज साहित्य वाटपानंतर शाळेतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद पाहून खूप समाधान वाटल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.पोथरे केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे साहेब यांनी बालाजी अमाईन्स लिमिटेड सोलापूर यांचेकडे साहित्य मिळवून देणेकामी विशेष पाठपुरावा करून शाळेला सहकार्य केले.
यावेळी विद्यार्थ्यांतर्फे कु.संस्कृती राजेंद्र झिंजाडे हिने दात्यांचे विशेष आभार मानून मिळालेल्या शैक्षणिक साहित्याच्या आधारे आम्ही आपली शैक्षणिक वाटचाल अधिकाधिक प्रज्वलित करु असे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अभिवचन दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. शकुर शेख सर यांनी केले तर श्रीम.शगुफ्ता हुंडेकरी मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री . बापूराव रोकडे सर, श्रीम. राजश्री सावंत मॅडम , श्रीम. शाबिरा मुलाणी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले .