तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत पोथरे शाळेचा दबदबा कायम

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा - डॉ . बाबासाहेब आंबेडकर प्रशाला करमाळा येथे आज (गुरुवार दि.६) घेण्यात आलेल्या टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धेत वैयक्तिक प्रकार मध्ये जिल्हा परिषद पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . यामधे प्रामुख्याने यशस्वी स्पर्धक खालीलप्रमाणे -
कथाकथन स्पर्धा
💥लहान गट - 
🔹व्दितीय क्रमांक - वैष्णवी गणेश शिंदे ( इ. पाचवी )
🔹तृतीय क्रमांक - श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे (इ . चौथी)
💥मोठा गट -
🔹तृतीय क्रमांक - सई सचिन शिंदे ( इ. सहावी )
चित्रकला स्पर्धा
💥मोठा गट -
🔹प्रथम क्रमांक - तेजस्विनी सुनिल झिंजाडे (इ . सातवी )
🔹व्दितीय क्रमांक - संस्कृती राजेंद्र झिंजाडे (इ . सातवी)
💥लहान गट -
🔹तृतीय क्रमांक - मृणाल बप्पासाहेब शिंदे ( इ . पाचवी )
निबंध स्पर्धा
💥मोठा गट -
🔹तृतीय क्रमांक - सानिका अशोक नंदरगे (इ . सातवी)
    तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री . नितीन कदम साहेब, विस्ताराधिकारी श्री . जयवंत नलवडे साहेब, श्री . टकले साहेब,श्रीम. प्रभावती जगताप मॅडम ,पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे सर व पोथरे शाळेचे मुख्याध्यापक श्री . शकुर शेख सर यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचा विशेष सन्मान करून त्यांचे कौतुक केले .या सर्व स्पर्धकांना पोथरे शाळेतील विषयशिक्षिका श्रीम . शगुफ्ता हुंडेकरी (शेख) मॅम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याकामी शाळेतील उपशिक्षक श्री . बापूराव रोकडे सर, श्री. लहू जाधव सर, श्रीम. शाबिरा मुलाणी मॅम, श्रीम. राजश्री सावंत मॅम यांचे विशेष सहकार्य लाभले .पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी तालुका स्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवून पोथरे गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . यशवंत शिंदे, उपाध्यक्षा सौ . विद्याताई शिंदे व सर्व सन्माननीय सदस्य तसेच पोथरे गावचे सरपंच मा .श्री . अंकुश शिंदे सर व सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी सर्व सहभागी स्पर्धक, मार्गदर्शक व सर्व शिक्षक यांचे आभार मानून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल