गणेश चिवटे यांच्या हस्ते शेलगाव क. येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा (स्था.प्र.): सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील शेलगाव क.येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा काल (सोमवार दि. ३) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.ही सर्व विकासकामे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून ती गणेशभाऊ चिवटे यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आली होती. जि.प शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी दहा लाख रुपये, आरो प्लांट बसवण्यासाठी तीन लाख रुपये , नागनाथ मंदिर ते चोपडे वस्ती रस्ता मुरूमीकरणासाठी तीन लाख रुपये व स्ट्रीट लाईट दिव्यासाठी पाच लाख अशा कामांचा समावेश आहे. यावेळी बोलताना गणेशभाऊ चिवटे म्हणाले की,शेलगावसह करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपली वचनबद्धता आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे मंजूर झाली आहेत. आगामी काळात राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी अनेक योजना राबविण्याचा आमचा संकल्प आहे,” असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने गणेशभाऊ चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डोळ्यांची तपासणी, मोफत औषधोपचार व मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आणि लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, जेष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, अमोल पवार, सचिन गायकवाड, राजेश पाटील, भरत गुंड, शरद कोकीळ यांच्यासह शेलगाव येथील जेष्ठ नेते माजी सरपंच श्री. रामचंद्र आबा काटुळे, विद्यमान सरपंच प्रतिनिधी श्री. राहुल कुकडे, माजी सरपंच श्री. आत्माराम वीर, माजी सरपंच श्री.पांडुरंग वीर, माजी सरपंच श्री. अशोक काटुळे सर, माजी ग्राम.प. सदस्य श्री. अशोक माने, ग्राम.प. सदस्य प्रतिनिधी श्री. अजिनाथ वीर, माजी पोलीस पाटील श्री. श्रीधर वीर पाटील, हनुमान दुध संस्थेचे चेअरमन श्री. अभिमान वीर, समाजसेवक श्री. पितांबर कुकडे, श्री. गणेश माने, श्री.संदीप वीर पाटील, भावी ग्राम.प.सदस्य श्री. अशोक वीर, तसेच जितेंद्र वीर, प्रज्वल माने, प्रदीप बनसोडे, वीर ट्रेडर्स चे प्रदीप वीर, प्रशांत वीर, राजेश वीर, उमेश वीर, युवा नेते रणजीत वीर आणि शेलगाव चे विविध क्षेत्रातील बहुसंख्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमास स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, भाजपा कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेलगाव ग्रामपंचायत, स्थानिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल