देवळाली ग्रामपंचायत माजी सरपंच आशिष गायकवाड यांचा विजय हायकोर्टात आवटे यांचे रिट पिटीशन रद्द

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा स्था.प्र.- देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रभावी कार्यकर्ते आशिष गायकवाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अपात्रतेचा दावा अखेर कोल्हापूर खंडपीठात फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे गायकवाड यांना मोठा न्याय मिळाला असून, ग्रामपंचायतीतील त्यांच्या पात्रतेचा निर्णय कायम राहिला आहे.ही संपूर्ण प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरु होती. सुधीर आवटे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे आशिष गायकवाड यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याबाबत अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालानंतर गायकवाड यांनी त्या निर्णयाविरोधात कमिशनर, पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपील कमिशनर यांनी मंजूर करत, गायकवाड पात्र असल्याचे घोषित केले होते.
         त्यानंतर सुधीर आवटे यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्ट, खंडपीठ कोल्हापूर येथे रिट पिटीशन दाखल केले होते. मात्र न्यायालयाने संपूर्ण बाबींची सविस्तर छाननी केल्यानंतर आशिष गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत, आवटे यांचे रिट पिटीशन फेटाळून लावले.
या प्रकरणात ॲड. अजिंक्य गायकवाड व ॲड. ऋत्विक गाडगे यांनी आशिष गायकवाड यांचे कायदेशीर प्रतिनिधीत्व करत प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे देवळाली ग्रामपंचायतीतील गायकवाड यांचे राजकीय स्थान आणखी मजबूत झाले आहे.
        या निकालानंतर संजयमामा शिंदे गट तसेच कल्याण भाऊ गायकवाड युवा मंच, देवळाली यांच्या वतीने आशिष गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्यात नेहमी आघाडीवर राहिलेल्या आशिष गायकवाड यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केल आहे.
“सत्य आणि न्याय नेहमीच विजय मिळवतो. माझ्यावर दाखल केलेले अपात्रतेचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते, मात्र न्यायालयाने वस्तुस्थिती ओळखून न्याय दिला आहे.”
               @आशिष गायकवाड, देवळाली 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)