श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान- पोथरेहून चार वेगवेगळ्या दिंड्यांचे पंढरपूरकडे भव्य प्रस्थान..! (समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्तीचा प्रेरणादायी वारकरी संकल्प)

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
पोथरे – भक्तिभाव, टाळमृदुंगाच्या गजरात आणि "माऊली माऊली" च्या जयघोषात श्री क्षेत्र शनैश्वर देवस्थान, पोथरे ता. करमाळा येथून वेगवेगळ्या चार पवित्र दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
"वारी नाही भावाची, ही तर आहे परिवर्तनाची दिंडी!"व्यसनमुक्त समाज – जागरूक वारकरी समाज,श्री शनैश्वर महाराजांच्या आशीर्वादाने ही वारी बनली आहे भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श! 
या उक्तीप्रमाणे समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती हे या वारीचे मुख्य उद्दिष्ट असून,वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा व पुढील वर्षी एक दिंडी करण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी बोलून दाखवला.
या चारही दिंड्यांचे श्री व्यवस्थापन पुढीलप्रमाणे
१) हभप डॉ. बाबुराव हिरडे, नानासाहेब पठाडे, दत्ता हिरडे, अनिल झिंजाडे व इ.
२) लक्ष्मीकांत झिंजाडे, अण्णा झिंजाडे, धनंजय झिंजाडे पाटील व इ.
३) हभप. दत्तात्रय नंदरगे, हरिभाऊ झिंजाडे, रणजित शिंदे, संदीप शिंदे पाटील, प्रसाद कुलकर्णी व इ.
४) वारकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब शिंदे, पंडित भांड व इ.
या चारही दिंडी सोहळा प्रस्थानासाठी अनेक युवक व महिलांनी विशेष सहभाग नोंदवला.अनेकांनी वाहन, स्पीकर व सेवा-व्यवस्थापन करत उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.श्री शनैश्वर महाराजांच्या पावन भूमीतून निघणाऱ्या या भक्तीमय प्रवासात संपूर्ण गाव एकवटलेले पाहायला मिळाला.
या प्रस्थानावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे,दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ,भाजपा सरचिटणीस नितीनभाऊ झिंजाडे,साहित्यिक हरिभाऊ हिरडे,प्रा.गोपीनाथ पाटील,हरिश्चंद्र झिंजाडे,उद्योजक सुधीर झिंजाडे, शांतीलाल झिंजाडे,राज झिंजाडे, सुनिल पाटील, किरण झिंजाडे, संदीप नंदरगे, गणेश ढवळे,मारुती लाढाणे, हर्षद आढाव, किशोर झिंजाडे, विनोद शिंदे, नारायण भांड,गंगाधर शिंदे, शहाजी राजाराम झिंजाडे,प्रेमराज शिंदे, पै सुरेश शिंदे,चंद्रकांत शिंदे आदी भक्ती संप्रदायातील मान्यवर, आजी-माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी संचालक, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.🏵️ गौरवाचा क्षण:
यावेळी सलग ४ दिवस पोथरे येथून पंढरपूकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोफत चहापाण्याची व्यवस्था करून वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या गावातील युवा उद्योजक रमेश आमटे,सुधीर झिंजाडे,अकबर शेख,सुनिल रंदवे व सहकाऱ्यांचा यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....