माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत गणेश चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन,ना. जयकुमार गोरेंचाही सकारात्मक प्रतिसाद

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा - माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले आहे.या मागणीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.गेली अनेक दिवसांपासून करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये प्रांताधिकारी नियुक्त नसल्याची बाब गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उमेश पाटील उपस्थित होते.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की करमाळा कुर्डूवाडी विभागांमध्ये अनेक दिवसांपासून प्रांताधिकारी नियुक्त नाही.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही यां मागणीची लागलीच दखल घेऊन लवकरच माढा उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती होईल असे सांगितले आहे अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे.करमाळा व माढा तालुक्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे शासकीय दाखले काढण्यासाठी विलंब होत आहे.शेतकरी व इतर नागरिकांना प्रांताधिकारी नसल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गणेश चिवटे यांनी ही मागणी महत्वपूर्ण करून या विषयाला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांमध्ये चिवटे यांचे कौतुक होत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)