गणेश चिवटे यांच्या शालेय साहित्य वाटप उपक्रमाने विद्यार्थ्यांचे चेहेरे फुलले

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश (भाऊ) चिवटे यांच्या संकल्पनेतून शालेय साहित्य वाटपाने फिसरे ता. करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे चेहेरे फुलले, नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी फिसरे येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक भरतभाऊ आवताडे, सरपंच हनुमंत रोकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कणसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी रामभाऊ ढाणे ,नानासाहेब आवताडे, दादासाहेब चाळक, रामभाऊ खंडागळे,दशरथ निकम, ज्ञानेश्वर चाळक, धनंजय आवताडे ,नवनाथ चाळक, मोहन नेटके,विनोद नेटके ,शुभम नेटके, प्रमोद पाटील, ह.भ.प.अवताडे महाराज, सोमनाथ पाटील, जोतीराम आवताडे , नानासाहेब साबळे, सुमित आवताडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)