पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाला अखेर यश:- संत निवृत्ती महाराज पालखीचा मार्ग होणार सुकर........................... (युवा सरपंच रवींद्र वळेकर यांच्या पाठपुराव्याला यश)
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा(प्र.):- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.यामुळे संत निवृत्ती महाराज पालखीचा मार्ग होणार सुकर झाल्याने युवा सरपंच रवींद्र वळेकर यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.तालुक्यात संत निवृत्ती महाराज यांची पालखी रावगाव येथे प्रवेश करते व ती कोंढेज - निंभोरे या मार्गे पुढे माढा तालुक्यात मार्गस्थ होत असते. या मार्गावरील कोंढेज ते निंभोरे हा चार किलोमीटरचा प्रवास अतिशय खडतर असल्यामुळे हा रस्ता पुढील वारीपर्यंत दुरुस्त झाल्यास आपण या रस्त्याने येऊ अन्यथा आपण मार्ग बदलू असे दिंडी चालक यांनी निंभोरे ग्रामस्थांना सुचित केले होते .युवा सरपंच रवींद्र वळेकर यांनी या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे करून आज दि.13 जून रोजी कोंढेज ते निंभोरे या रस्ते कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या अर्थसंकल्पीय निधी मधून या मार्गासाठी 2021 - 22 मध्ये 3 कोटी 32 लाख 50 हजार एवढी भरघोस निधीची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात केलेली होती. पुढे याच कामावरती स्थगिती आली आणि दरम्यान आमदार संजयमामा शिंदे यांनी HAM अंतर्गत 71 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 270 कोटींचा निधी मंजूर केला. हा मार्ग कोंढेज ते निंभोरे या मार्गावरून जात असल्यामुळे सदरची अर्थसंकल्पीय तरतूद रद्द करण्यात आली त्यामुळे प्रत्यक्षात काम सुरू व्हायला खूपच विलंब झाला. सदर काम होणार की नाही अशी विचारणा दिंडी चालक व ग्रामस्थ यांच्या मधून वारंवार होत होती अखेर याला आज उत्तर मिळाले असून HAM अंतर्गत सुरू असलेले काम विशेष बाब म्हणून निंभोरे ते कोंढेज या ठिकाणी तात्काळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ, संत निवृत्ती महाराज दिंडी चालक व वारकरी माजी आमदार संजयमामा शिंदे व सरपंच रवींद्र वळेकर यांच्या कामावरती समाधान व्यक्त करत आहेत.