पोथरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा.....रेश्मा सुरत काळे हिची पुणे कारागृह पोलीसपदी निवड
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
पोथरे :- येथील रेश्मा सुरत काळे हिची नुकतीच कारागृह पोलीस म्हणून निवड झाली आहे यामुळे पोथरेगावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. सुरत काळे यांनी अतिशय कष्टातून मुलांना शिकवले आहे.सुरत काळे लहान असताना आमच्या आईने (मथुराताई झिंजाडे ) दगडावर एक दोन,अ आ ई शिकवले होते.यातून सुरत काळे यांना शिक्षणाची किती आवड व रस होता हे दिसते.पुढे त्यांनी पोथी वाचणे,पोथीचा अर्थ सांगणे यातून अध्यात्मिक क्षेत्राची सेवा केली आहे.आज त्यांची मुलगी रेश्मा हिच्या यशाची बीजे ही सुरत काळे व त्यांच्या पत्नी यांच्या जिद्द व चिकाटी यामध्ये आहेत..... प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या म्हणीचा प्रत्यय यातून येतो.रेश्मा सुरत काळे हिच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून तिचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत. कौतुक होत आहे.
टिप्पण्या