पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री शताब्दी जयंती निमित्त करमाळा भाजपाकडून कमलादेवी मंदिराची स्वच्छता

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा स्था.प्र.- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान व इतर कार्यक्रम राबविण्यात आले होते या निमित्ताने आज करमाळा भाजपाकडून करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमला भवानी मंदिराची स्वच्छता करण्यात आली.
      भाजपाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे यावेळी म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबवले गेले त्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धा व मंदिर स्वच्छता अभियान राबवले या माध्यमातून सर्वच ठिकाणची हिंदू मंदिरे हे स्वच्छ आणि पवित्र राहतील असा संदेश या निमित्ताने देण्याचा प्रयत्न केला आहे, हे कार्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने व आमचे नेते गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेतला आहे.या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,रामभाऊ ढाणे,जगदीश अग्रवाल,मोहन शिंदे, भगवानगिरी गोसावी,पत्रकार दिनेश मडके,राजू सय्यद,गणेश महाडिक,आजिनाथ सुरवसे,लक्ष्मण शेंडगे,जयंत काळे,बापू मोहोळकर,विष्णू रंदवे,हर्षद गाडे,हर्षल शिंगाडे,दादा देवकर ,प्रवीण बिनवडे,भिष्माचार्य चांदणे सर,राजेश पाटील,प्रकाश ननवरे,अभिषेक चिंचकर,शंभूनाथ मेरुकर,जनार्दन पवळ,नितीन पवळ,बाबा निकम,भैय्या दळवी,नारायण घाडगे,गुरुदास गोडगे,रणजीत पवार,किरण बागल,गजानन घाडगे,नाना अनारसे,लक्ष्मण काळे,संतोष जवकर,आण्णा गोडगे,सनी माने,शैलेश राजमाने,अनिकेत क्षिरसागर,अक्षय शहा,राजेश पाटील,अतुल इंदुरे,भरत गुंड,आजिनाथ जगदाळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल